आज संपुर्ण देशात नवरात्रीचा आठवा दिवस अष्टमी उत्साह साजरा केला जातो. सर्व भक्त आपआपल्या परीने देवीची आराधना करतात. बॉलीवूडमधील अनेक कलाकार भक्तीभावाने हा उत्साह साजरा करतात. बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने देखील नवरात्री निमित्त 9 कुमारिकांची पुजा केली. तिने तिची मुलगी समिशाला सुंदररित्या सजवलं आहे. समिशाची ही पहिली नवरात्र आहे.
शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये शिल्पा पुजा करताना दिसत आहे. तिने छोट्या समिशाच्या पायालाही कुंकू लावून तिची पुजा केली आहे. तिच्याबरोबर आठ कुमारिकांचीही शिल्पाने पुजा केली. यावेळी तिचा नवरा राज कुंद्रा आणि तिची बहीण शमिता शिट्टीही दिसत आहेत.
ही पोस्ट शेअर करत शिल्पा म्हणते, ‘आज अष्टमीला शुभ मुहूर्तावर आम्हाला आशिर्वाद म्हणून आमची मुलगी समिशा मिळाली. ही तिची पहिली नवरात्र आहे. म्हणून आज मी कन्या पुजा केली. या कार्यक्रमादरम्यान शिल्पाने कोरोनाचे सर्व नियम पालन करून पुजा केली.