काही दिवसांअगोदर एका झॉमॅटो डिलीव्हरी बॉयने त्याला ऊशिर का झाला असे जाब विचारले असता, त्याने ग्राहकाच्या नाकावर बुक्का मारल्याचे प्रकरण समोर आले होते. मॉडेल हितेशा चांद्राणी हीच्यासोबत ही घटना घडली असून सोशल मिडियाच्या सहाय्याने तीने जखमी अवस्थेतील एक व्हिडिअोसुद्धा व्हायरल केला होता. हा व्हिडिअो नेटकर्यांमध्ये प्रचंड व्हायरल झाला होता. आता त्या झोमॅटो डिलीव्हरी बॉय कामराजला बॅंगलोर पोलिसांनी अटक केली.कामराजने त्याच्या जवाबात त्यादिवशी घडलेला विचित्र प्रकार सांगीतला. हे ऐकुन पोलिससुद्धा चक्रावुन गेले आहेत.
मी पार्सल घेऊन जेव्हा त्यांच्या घरी पोहचलो, तेव्हा रस्ता खराब आणि ट्रॅफीक मुळे उशिर झाला असे सांगत त्यांची माफी मागितली. हितेशाने पार्सल ताब्यात घेतल्यानंतर मी पैसे मागितले तेव्हा त्यांनी कस्टमर सपोर्टरशी बोलत असल्याचे सांगीतले. त्यानंतर कस्टरमर सपोर्टरने कामराजला अॉर्डर कॅन्सल झाल्याचे सांगीतले. तेव्हा कामराजने तिला जेवण परत मागितले आणि अचानक हितेशाने कामराजला शिव्या देण्यास सुरुवात केली.कामराजने तिथून निघण्याचा प्रयत्न केल्यावर त्याच्यावर चप्पलसुद्धा ऊगारली आणि मागून अंगावर धावत आली. अशावेळी केवळ मी वार झेलण्यासाठी हात समोर केला. तेव्हा हितेशाला तिचाच हात तिच्या नकावर लागला आणि तिच्या बोटातील अंगठीमुळे तिला जखम झाली असल्याचे कामराजने सांगीतले.
मी गेल्या दोन वर्षांपासून काम करतो आहे. परंतू असा प्रकार पजिल्यांदाच माझ्यासोबत घडला आहे. याअगोदर कधीही असे झाले नाही. असे कामराजने पोलिस चौकशी दरम्यान सांगीतले आहे. हितेशाचा तो व्हिडिअो नेटवर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यामुळे झोमॅटोची बदनामीसुद्धा झाली. आता समोर अालेल्या माहितीनंतर झोमॅटो पुढे काय करते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.