राज्यावर अतिवृष्टीचे संकट आले आहे. शेतकऱ्यांचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुकसानग्रस्त परिस्तिथी पाहण्यासाठी सोलापूर दौऱ्यावर गेले होते. अतिवृष्टीचे संकट टळेपर्यंत नुकसान भरपाई संदर्भात कोणताही निर्णय घाईघाईने घेणार नाही, असे ठाकरेंनी सांगितले. मला नुकसानाची परिस्थिती आजचं कळली नाही, पावसाला सुरवात झाल्यापासूनचं मी यंत्रणेच्या संपर्कात आहे. नुकसान किती होतंय, पाऊस किती पडतोय याची माहिती मी सातत्याने घेत होतो, या सगळ्यांचा अंदाज घेऊन प्रत्यक्ष मदत जाहीर केली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
सोमवारी सोलापूर दौऱ्यावर ते गेले होते. तिथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलतं होते. केंद्र सरकार हे आपल्या देशाचं सरकार आहे, परदेशातील नाही. राज्यांना मदत करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. वेळ पडल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागु, असे त्यांनी वक्तव्य केले. राज्यातील विरोधी पक्ष राजकारणाचा विचार करतील, मात्र देशाच्या सरकारला मदत करताना पक्षपात करून चालणार नाही. अतिवृष्टीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून नुकसानाची चौकशी केली, त्यांना सगळ्याची जाणीव असेल असे मुख्यमंत्री म्हणाले.