सध्या ‘बिग बॉस’ 14 चे पर्व सुरू आहे. ते मोठ्या प्रमाणावर गाजलेले दिसत आहे. शनिवारी ‘बिग बॉस’ च्या घरात ‘विकेंड का वार’ होता. यावेळी सलमान खान घरातल्या सदस्यांसोबत गप्पा मारताना दिसले. यावेळी काही चुकांबद्दल ते सदस्यांची कानउघडणी करत होते. काही मजाक मस्ती सुरू असतांनाचं त्यांनी स्पर्धकांना उत्तम प्रकारे खेळण्याचे सल्ले दिले.
‘बिग बॉस’ 14 व्या पर्वातील सदस्य शांत आहेत. त्यांनी अजून जोशात खेळ खेळायला हवा असं सलमानचं मत होतं. हे सांगत असतांनाचं ‘टीआरपीसाठी नुकतेच ओरडून काही होत नाही’ असा टोला त्यांनी अर्णब गोस्वामीला लगावला. त्यांच्या बिनधास्त वक्तव्यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. टीआरपी सर्वांनाच हवा असतो, परंतु त्यासाठी चुकीचे बोलू नये, ओरडून नाही तर शांततेत सत्याच्या बाजूने टीआरपी मिळवण्याचा प्रयत्न करावा. असे सलमानने अप्रत्यक्षरित्या सांगितले. सलमानची हिच गोष्ट चाहत्यांना प्रचंड प्रमाणात आवडते.