नेटकऱ्यांच्या दबावापुढे तनिष्क झुकले, मागे घेतली वादग्रस्त जाहिरात

31

तनिष्क या दागिन्यांची विक्री करणाऱ्या कंपनीला नेटकऱ्याच्या दबावापुढे झुकावे लागले आहे. तनिष्कने आपल्या एका जाहिरातीत हिंदू मुलीने मुस्लीम मुलाशी ल्गन केले असून तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम जाहिरातीत दाखवला होता. या जाहिरातीवरून मोठी टिकेची झोड नेटकऱ्यानी उठवली होती. ही जाहिरात लव्ह जिहादला प्रोत्साहन देणारी असल्याचे टिकाकारांचे म्हणने होते.

याच जाहिरातीवर बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतनेही टिका केली होती. कंगनाने लिहिले की, ‘एक हिंदू सून बर्‍याच दिवसांपासून कुटुंबासोबत असली तरी ‍वारस देताना तिला स्वीकारलं जातं. मग मुलगी ही काय फक्त बाळ जन्माला घालणारी मशीन आहे का? ही जाहिरात केवळ लव्ह जिहादलाच नव्हे तर लिंगभेदालाही प्रोत्साहन देते.सोशल मीडियावर या जाहिरातीवरून होत असलेली टीका पाहिल्यानंतर तनिष्क कंपनीने ही जाहिरात मागे घेतली आहे. या जाहिरातीची यूट्यूब लिंक कंपनीने प्रायव्हेट केली आहे. यामुळे ही जाहिरात लोकांना पाहता येणार नाही.