‘नेट’वर्क गेल्याने ग्राहकांची माथी भडकली, ऑनलाईन परिक्षेतही घोळ

19

वोडाफोन आयडीयाची सेवा काल दिवसभर बंद होती. पुण्यात झालेल्या जोरदार पावसाने सेवेवर परिणाम झाला. परिणाणी ग्राहकांना मात्र फुकटचा मनस्ताप सहन करावा लागला. वोडाफोन आयडीया ची सेवा कोलमंडल्याने जवळपास अर्ध्या राज्यातील लोक त्रस्त होते. अनेक ठीकाणी लोकांनी vi स्टोअरवर गर्दी केल्याचे चित्र पहायला मिळाले. विद्यार्थ्यांनाही याचा मोठा फटका बसला असून बामू विद्यापीठाच्या परिक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थांना सेवा कोलमडल्यामुळे परिक्षा देता आली नाही.

सर्वरच्या तांत्रिक बिघाडामुळे राज्याच्या निम्म्याहून अधिक सर्कलमध्ये ‘वी’ च्या ग्राहकांना नेटवर्कचा त्रास सहन करावा लागत लागला. त्यामुळे कंपनीच्या अशा भोंगळ कारोभारामुळे ग्राहक संतापले होते. बुधवारी राज्यात मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे त्या रात्रीपासून ‘वी’ चे नेटवर्क गायब झाले होते. नेटवर्कच नसल्याने ग्राहकांना कंपनींच्या ग्राहक सेवा केंद्राशी सुद्धा संपर्क होऊ शकला नाही.

त्यामुळे ‘वी’ चे ग्राहक कंपनीच्या या ढिसाळ कारभाराविरोधात सोशल मीडियावर उतरले आहे. ग्राहकांनी ट्विटर कंपनीविरोधात आपला आक्रोश व्यक्त केला आहे. तर एकीकडे विद्यार्थ्यांची ऑनलाईन परिक्षा सुरू आहे. अशातच नेटवर्कच येत नसल्याने विद्यार्थ्यांसह पालक ‘वी’ विरोधात संतप्त झाले आहे. आज औरंगाबादसह राज्यातील अनेक शहरात ग्राहकांनी ‘वी’ च्या स्टोअर बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मध्यरात्रीपासून वोडाफोन आयडीयाची सेवा सुरळीत करण्यात आली आहे.