‘नेहु दा ब्याह’ सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्करचा विवाहसोहळा संपन्न

26

गायिका नेहा कक्कर लग्नबंधनात अडकली. पंजाबी गायक रोहनप्रीत सिंहसोबत पंजाबी पध्दतीने नेहाने लग्न केले. अनेक दिवसांपासुन तीच्या ग्रँड वेडिंगची उत्सुकता लागली होती. नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह यांचा विवाहसोहळा दिल्लीमधील गुरुद्वारामध्ये संपन्न झाला.

पारंपरिक पद्धतीने झालेल्या या विवाह सोहळ्यात दोघांचेही कुटुंब आणि मित्रपरिवार उपस्थित होते. बॉलीवूडचे काही कलाकारही या सोहळ्यात उपस्थित होते. पंजाबमध्ये त्यांच रिसेप्शन होणार असून यामध्ये कुटुंब आणि बॉलीवूडमधील कलाकार असणार आहेत.

लग्नात नेहाने गुलाबी रंगाच्या शेडमध्ये लेहंगा घातला होता. त्यांच्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेहाच्या चाहत्यांना तिच्या लग्नाची उत्सुकता लागली होती. अखेर नेहाने रोहनप्रीतच्या गळ्यात माळ घातली. नेहाच्या नावापुढे नक्की कोणाचं नाव लागणार असा चर्चा खूप दिवसांपासून सुरु होत्या. अखेर सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला. नेहा आणि रोहनप्रीतचे फॅन्स त्यांना सोशल मीडियावर भरपूर शुभेच्छा देत आहेत.