जगभरात कोरोनाच्या संसर्गाची लाट असल्याचे चित्र दिसत आहे. परंतु आता राज्यात अनलॉक करण्याची तयारी सरकारने सुरू करण्यात आली आहे. टप्याटप्याने हे अनलॉक होण्याची शक्यता वर्तवली आहे. हे करताना सरकारकडून या बाबत जबाबदारी देखील घेतली जात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला आवाहन केले आहे. ‘आम्ही जबाबदारी घेतो, तुम्ही खबरदारी घ्या’ असा सल्ला देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. हळूहळू बंद असलेले उद्योगधंदे, व्यापार एक-एक करून सुरू करू असेही सांगण्यात आले. गणपती येउन गेले आहेत, नवरात्री येत आहे, दिवाळी येत आहे त्यामुळे मी मंदिराच्या बाबतीतही विचार करत आहे असे ठाकरेंनी सांगितले आहे.
नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्र अनलॉक करण्याची तयारी सुरू आहे. परंतु अनलॉक कधी होणार याबाबत मुख्यमंत्री स्पष्ट बोलले नाहीत.