जळगावात एक अजब प्रकार घडला आहे. पत्नीशी सुखाचा संसार सुरू असताना, डॉक्टर पतीने बायकोच्या मैत्रिणीशी सुत जुळविले. तिच्यासोबत दुसऱ्या लग्नाचे स्वप्न रंगवत असताना तिचे लग्न ठरले. काही दिवसांत तिचा साखरपुडा होणार म्हणून डॉक्टरने बायकोच्या मैत्रिणीला पळवून नेऊन श्रीरामपूर मध्ये राहण्याची व्यवस्था केली. लग्न ठरलेलं असल्याने मुलगी घरातून गायब कशी काय झाली ? अशी चिंता सदरील मुलीच्या आई वडिलांना होती. डॉक्टर आई वडिलांना तुमच्या मुलीचा शोध लागला का ? पोलिस तपास करत आहेत असं विचारत सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केले. मात्र, लवकरच पोलिसांनी डॉक्टरचा चेहरा उघड केला.
एकाच महाविद्यालयात बीएससी शिक्षण घेत असलेल्या दोन जिवलग मैत्रिणी त्यातील एकीचे शेंदुर्णी येथील डॉक्टरशी लग्न झाले. दोघी घनिष्ट मैत्रिणी असल्याने दुसरीचे पहीलिकडे येणे जाणे होते. त्यातच डॉक्टरने बायकोच्या मैत्रिणीशी सुत जुळवले. त्याचे रूपांतर प्रेमात होऊन तब्बल चार वर्ष ते रिलेशन मध्ये होते. यावर्षी बायकोच्या मैत्रिणीचे लग्न ठरल्याचे डॉक्टरने आधीच तिला पळवून श्रीरामपूर येथे ठेवले होते.