रिकाम्या बोगद्यात कुणीच नसताना पंतप्रधान कोणाला हात उंचावून अभिवादन करत होते. असा प्रश्न अनेकांना पडला आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनीही हा प्रश्न उपस्थित केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी टीकाही केली आहे.
“निर्मनुष्य असलेल्या बोगद्यात मोदी कोणाकडे पाहून हात हलवत होते? तिथे तर जनता नव्हती. देशाला अनर्थाच्या वाटेवर घेऊन जाणाऱ्या आत्ममग्न पंतप्रधानांच्या प्रकृतीवर परिणाम तर झाला नाही ना?” असं ट्विट प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. लोकांना मोदींच्या प्रकृतीची माहिती मिळायलाच हवी. विशेष म्हणजे महोदयांनी यापूर्वीही असं केलं आहे,” असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी हिमाचलमधील अटल बोगद्याचे उद्घाटन केलं. उद्घाटनानंतर बोगद्यातून चालत जातांना हात हलवून दाखवणाच्या मोदींच्या फोटोवर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. त्यातच प्रकाश आंबेडकरांनी आता ट्विट करत टीका केली आहे.