भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा आज (26 सप्टेंबर) वाढदिवस आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर म्हणून मनमोहन सिंग यांनी काम केले आहे. तसेच भारताचे अर्थमंत्री म्हणूनही त्यांनी आपली कारकिर्द गाजवली आहे.
वाढदिवसानिमित्त माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना विविध स्तरातून शुभेच्छा येत आहेत.भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील मनमोहन सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. वाढदिवसानिमित्त मी मनमोहन सिंग यांच्या दीर्घायू आणि निरोगी आयुष्याची कामना करतो असं म्हटलं आहे.