पं.बंगालमध्ये ममतांच्या सनर्थनार्थ शिवसेना! काय आहे रणनिती?

8

पं.बंगालमध्ये निवडणुकांचे पडघम वाजले आहे. सत्तेत असणार्‍या तृणमुल कॉंग्रेसला शह देण्यासाठी भाजपकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांनी प्रचारसभांचा सपाटाच बंगालमध्ये लावला आहे. तसेच भाजपमध्ये मोठ्याप्रमाणात तृणमुलच्या नेत्यांचे ईनकमींग होते आहे. या पार्श्वभूमोवर शिवसेनेने स्वत: निवडणुक न लढवता ममता बॅनर्जी यांना पाठींबा देणार असल्याचे जाहीर केले आहे. शिवसेनेचे प्रवक्ते आणि खा. संजय राऊत यांनी ही माहिती दिली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेने भाग घेतला होता. यानंतर पं.बंगालमधील निवडणुका लढवण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला होता. संजय राऊत यांनीच याबाबत अधिकृत माहिती दिली होती. मात्रा आता शिवसेनेने आपला निर्णय बदलून ममता बॅनर्जींच्या पाठीशी ऊभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.

पं. बंगालमधील एकंदर परिस्थिती बघता सर्व ममता दीदींच्या विरुद्ध आहेत. तीन “एम” म्हणज मनी, मसल आणि मिडिया या तीनही बाबींचा त्यांच्याविरोधात जोमाने वापर केला जातो आहे. त्यामुळे पक्षप्रमुख ऊद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर निवडणुक न लढवता मनता बॅनर्जींना समर्थन देणार असल्याच ठरलं आहे. आणि आम्हाला ममता बॅनर्जींवत पूर्ण विश्वास आहे. कारण त्याच एकट्या बंगालच्या वाघीण आहेत. असे संजय राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

पं.बंगालमध्ये निवडणुकांच्या प्रचारांनी चांगलाच जोर धरला आहे. सध्यातरी एकंदरीत परिस्थिती बघता भाजपची बाजू भक्कम दिसते आहे. मात्र काही खाजगी सर्व्हे ममता बॅनर्जीं यांचेच सरकार सत्तेत येणार असल्याचे अंदाज वर्तवले आहे.