महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असताना धनगर आरक्षांचा मुद्दा देखील आता मोठ्या प्रमाणात पुढे येऊ लागला आहे. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावर आक्रमक भूमिका घेतल्याचे सध्या दिसून येत आहे.
पडळकर यांनी धनगर आरक्षणासाठी राज्यभर रक्तदान मोहीम सुरु केली आहे. पडळकर म्हणाले तुम्ही आमचे रक्त प्यायलात, आता आम्ही आमच्या रक्ताचे दान देतोय, आतातरी आम्हाला आरक्षण द्या’, अशी भावनिक साद यावेळी त्यांनी घातली.
मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपण धनगर आरक्षणाची मागणी केली होती. मात्र, धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारकडून दुजा भाव होत असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे पुन्हा समाज रस्त्यावर उतरला आहे. आम्ही लवकरच आरक्षण मिळवू असं त्यांनी म्हटलं आहे.