परभणीचे खासदार बंडू जाधव यांना जीवे मारण्याची धमकी

11

परभणी येथील शिवसेनेचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून, त्यांनी ननालपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दोन दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने खा. बंडू जाधव यांना धमकी दिली.

नांदेड येत टोळीने हा डाव रचला आहे. आणि त्यासाठी दोन कोटी रुपये दिल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. २७ ऑक्टोबर रोजी खासदार बंडू जाधव यांनी ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला. अचानक खासदारांना जीवे मारण्याच्या मिळालेल्या धमकी मुळे परभणी जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तसेच शिवसैनिकांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीचा लवकर शोध लावावा अशी मागणी केली आहे.