पहिल्यांदाच कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट

34

देशात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक बातमी मिळत आहे. ज्या ठिकाणी सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आढळत होते. अशा भागांमध्ये परिस्तिथी सुधारल्याची माहिती मिळत आहे. सोमवारी झालेल्या मोजणीनुसार गेल्या 63 दिवसानंतर देशामध्ये पाहिल्यादाचं कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली दिसून येत आहे.

सोमवारी देशामध्ये 53,082 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. ऑगस्ट महिन्यानंतर पहिल्यांदाच रुग्णांची संख्या एवढी कमी झाली आहे. 10 ऑगस्ट साली 51,296 रुग्ण देशामध्ये सापडले होते. त्यांनतर दिवसेंदिवस या संख्येत वाढ होत गेली. लाखांच्या घरात कोरोनाचा आकडाही पोहोचला होता. दिवसामध्ये 90 हजारापेक्षा जास्त कोरोना जास्त कोरोना रुग्ण आढळून येत होते.

सोमवारी कोरोना मृतांची संख्याही घटताना दिसून आली. 27 जुलै रोजी 638 मृत्यू झाले होते. त्याप्रमाणे सोमवारी 696 इतका आकडा नोंदवण्यात आला आहे. देशातील कोरोनापासून बरे झालेल्यांचे प्रमाण 86.36 इतके आहे. सर्वात जास्त कोरोना रुग्ण असलेल्या महाराष्ट्रामध्ये सोमवारी रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे.