पारले जी पुन्हा चर्चेत; घेतलाय महत्वपूर्ण निर्णय

23

छोट्यांपा सून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा आवडता बिस्कीट कोणता ? तर त्याच एकमेव उत्तर आहे. पारले जी ! कोरोना काळात याच पारले जीने अनेकांना आधार दिला होता. सगळ्यांना आवडत असलेल हेच बिस्कीट पुन्हा चर्चेत आलंय. मुंबई पोलिसांनी गेल्या काही दिवसांत TRP घोटाळा उघड केला. त्यानंतर पारले जी प्रोडक्ट्स बनवणाऱ्या कंपनीनं एक मोठा निर्णय घेतलाय. पारलेजी बिस्कीट टीव्ही चॅनेलवर जाहिरात करणार नाही, असा निर्णय कंपनीनं घेतला आहे. त्यानंतर सोशल मीडियावरून कंपनीच्या या निर्णयाचं कौतुक केलं जात आहे.

समाजात द्वेष पसरवणाऱ्या न्यूज चॅनेलला जाहिराती देणार नाही, अशी भूमिका पारले कंपनीचे वरिष्ठ अधिकारी कृष्णराव बुद्ध यांनी मांडलीय. सर्वच कंपन्यांनी आमच्यासोबत यावे, जेणेकरून न्यूज चॅनेलना कमीत कमी जाहिराती मिळतील, तसेच चॅनेल आपल्या कंटेटमध्ये बदल केला पाहिजे हा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचेल, असेही बुद्ध म्हणाले. पारलेजीच्या आधी बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनीसुद्धा कंपनीच्या जाहिराती जात असलेल्या तीन न्यूज चॅनेलना काळ्या यादीमध्ये टाकलं आहे.