पुणे विद्यापीठाचा निर्णय परीक्षेदरम्यान स्कॉड नसणार

15


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षेचा नवीन निर्णय झाला आहे. या परीक्षेमध्ये 50 हजारहून जास्त विद्यार्थी ऑफलाइन परीक्षा देणार आहेत. सध्या जगभरात कोरोनाचं संकट वाढत चाललं आहे. त्यामुळे परीक्षांसाठी भरारी पथक नेमने हे देखील सोईस्कर वाटत नाही. याऐवजी महाविद्यालयातील शिक्षकांना परीक्षक म्हणून नेमण्यात यावे. अशी सूचना परीक्षा विभागाने महाविद्यालयास दिली आहे. यंदा ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा घेण्याचे देखील ठरले आहे. 1 लाख 90 हजार विद्यार्थी ऑनलाईन तर 50 हजार विद्यार्थी ऑफलाईन परीक्षा देणार आहेत.

परीक्षांचे आयोजन करत असताना कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होऊ नयेत यासाठी भरारी पथकाची नेमणूक करण्यात येते. त्यातून गैरप्रकार आढळल्यास, कॉपी करताना आढळल्यास विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाते. परीक्षा 12 ऑक्टोम्बरपासून सुरू होणार आहेत. यावेळी परीक्षेच्या कालावधीत महाविद्यालयातील पर्यवेक्षक असणार आहेत. त्यामुळे विद्यापीठाला सहकार्य करण्याचे आवाहन परीक्षा विभागाने महाविद्यालयांना केले आहे.