गेल्या 24 तासांपासून पावसाने हजेरी लावली आहे. पावसाने पुणे शहर झोडपून काढलं आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पुणे जिल्हाही पाण्याने तुंबला आहे. तसेच काही कोविड सेंटरमध्ये देखील पाणी शिरल्याने प्रशासनासह कोविड रुग्णांची देखील गैरसोय झाली आहे.
पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्युटच्या पायथ्याजवळ पाणी साचालं आहे. काही ठिकाणी भिंती कोसळल्या आहेत. अजूनही काही जिवीतहानी झालेली नाही. परिसरात पाण्याच्या पातळीची वाढ झाली आहे. यामुळे वाहतुक सेवाही बंद करण्यात आली आहे. या मुसळधार पावसात काल वीज देखील गेली होती.
विमाननगर, सोपानगर, चंदननगर, खराडी, बिबवेवाडी, पाषाण, कर्वेनगर या भागांतील सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं आहे. कालच पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज वेधशाळेने दिला होता. परंतु पुढील काही वेळात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.