कोरोना मुळे सगळं जनजीवन विस्कळित झालं होतं. मात्र आता पुन्हा एकदा सगळं पूर्वपदावर येताना दिसतंय. केंद्र सरकार अनेक गोष्टी अनलॉक करायला सुरुवात केलीय. त्यातच सिनेमा रसिकांसाठी खुशखबर आहे. 15 ऑक्टोबरपासून सिनेमागृह उघडण्यास केंद्र सरकारने सशर्त परवानगी दिली आहे. सिनेमागृह सुरु करण्यासाठी केंद्र सरकारकडून नियम जारी करण्यात आलेत
हे असतील नियम…
१) सिनेमागृहाच्या क्षमतेच्या 50 टक्केपेक्षा अधिक प्रेक्षकांना परवानगी नसावी,
२) थिएटरमध्ये बसताना योग्य फिजिकल डिस्टंन्सिंगचे पालन करावे, ‘येथे बसू नये’ असे सीट्सवर मार्क करणे आवश्यक.
३) हँडवॉश आणि सॅनिटायझर पुरवण्यात यावे.
४) मोबाइलमध्ये आरोग्य सेतू App असणे गरजेचे.
५) थर्मल स्क्रिनिंग करणे आवश्यक केवळ लक्षणे नसणाऱ्या व्यक्तींना प्रवेश दिला जाईल.
६) स्वत:च्या आरोग्याचे निरिक्षण आणि कोणत्याही आजार असल्यास त्याबाबत अहवाल देणे.
७) वेगवेगळ्या स्क्रीनसाठी वेगवेगळ्या वेळा असणे आवश्यक,
८) पेमेंट करताना डिजिटल पद्धतींना करावे,
९) बॉक्स ऑफिस आणि इतर भागात नियमित स्वच्छता, डिसइन्फेक्शन करावे.
१०) बॉक्स ऑफिसवर आवश्यक काऊंटर उघडली जावी, मध्यांतराच्या वेळी प्रेक्षकांनी गर्दी टाळावी.
११) सोशल डिस्टंन्सिंगसाठी बॉक्स ऑफिसमध्ये जागोजागी मार्किंग केले जावे.
१२) तिकिट खरेदी पूर्ण दिवस सुरू असावी.
१३) गर्दी टाळण्यासाठी आगाऊ तिकिट बुकिंगची सेवा द्यावी.
१४) थुंकण्यास सक्त मनाई.
१५) खोकताना, शिंकताना खबरदारी घेणे गरजेचे.