माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील जनतेच्या अनेक समस्यांविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वारंवार पत्र लिहित आले आहेत. आज पुन्हा विदर्भातील पुरानंतर मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे झालेले प्रचंड नुकसान,अद्याप त्याचे पंचनामे न होणे,शासनाची उदासिनता आणि अक्षम्य दुर्लक्ष. कोरोनाच्या संकटात बळीराजा हवालदिल असताना मराठवाड्यातील शेतकर्यांना तत्काळ मदत देण्यासंदर्भात मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे
देवेंद्र फडणवीस सध्या बिहार निवडणूकीच्या अनुषंगाने बिहार मध्ये आहेत तरीही मागच्या १०-१२ दिवसांपासून मराठवाड्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांच्या पिकांचा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे लक्षात येताच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून लवकरात लवकर पंचनामे करून शेतकर्यांना मदत करण्यासंबंधी पत्र लिहिले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या पत्राची दखल घेवून किती लवकर मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा देतील हे पाहणे औत्सुक्याचे राहील.