पूल गेला वाहून; शेतकरी पोहत, पोहत फडणवीसांच्या भेटीला

12

आवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी अनेक मंत्री राज्यात दौरे करत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दौंड बारामती भागात दौरा करत आहेत. पावसामुळे रस्त्यांचं मोठं नुकसान झालं असल्याने, गावापर्यंत पोहचन अशक्य झालं आहे. यावेळी फडणवीस यांनी दौंड तालुक्यातील मळद गावातील शेख वस्तीतील नागरिकांशी संवाद साधला. देवेंद्र फडणवीस ओढ्याच्या अलिकडे आणि गावकरी पलिकडे अशी अवस्था झाली होती. ज्या ओढ्याच्या काठावर उभे होते, त्या ओढ्याचा पूल प्रचंड पावसामुळे वाहून गेला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या आवाजात ओढ्या पलिकडील गावकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, फडणवीसांचा आवाज गवकर्यांपर्यंत पोहोचत नव्हता. गेल्या आठ दिवसांपासून या गावात लाईट नाही, अन्न-धान्याचं नुकसान झालं आहे.

फडणवीस हे ओढ्याच्या पलिकडे असल्याने, आपली व्यथा मांडण्यासाठी गावातील पोपट मुलाणी हे पोहत, पोहत देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचले. पाण्यातूनच त्यांनी आपल्या व्यथा माध्यमांसमोर व्यक्त केल्या. परतीच्या पावसाने केलेलं नुकसान त्यांनी फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले.