फडणवीस-राऊत भेट; राऊतांनी राजशिष्टाचार पायदळी तुडवला

80

राज शिष्टाचार ही व्यापक संकल्पना आहे. यात अनेक गोष्टी समाविष्ट आहेत. काल फडणवीस-राऊत भेट झाली. भेट गुप्त होती. ऐतिहासिक काळापासून चालत आलेल्या राजकारणाचे काही शिष्टाचार असतात. पैकी एक शिष्टाचार म्हणजे मुत्सद्दी गप्पाष्टकाची गोपनीयता होय. दोन परस्परविरोधी राजकीय गट जेव्हा एकमेकांशी पडद्यामागे चर्चा करतात तेव्हा त्यातली गोपनीयता पाळणे हा अलिखित राजशिष्टाचाराचा भाग असतो.

दोन परस्परविरोधी राजकीय पक्षांनी पक्ष असो की थेट युद्धासाठी समोरासमोर उभे ठाकलेल्या दोन सेना असोत जेव्हा त्या दोन गटांमध्ये मुत्सद्दीच्या अनुषंगाने काही भेटी होतात त्या गुप्त असतात त्यातील वार्ता बाहेर पडू नयेत ही दोन्ही बाजूंची नैतिक जबाबदारी असते. युद्धासाठी सज्ज असलेल्या दोन गटात दूत पाठवून सल्लामसलत करणे जेव्हा दोनी गटांसाठी गरजेचे तेव्हाच अशा भेटी होतात.

अशा भेटी आपण इतिहासात अनेकदा पाहिल्या असतील परंतु त्या भेटींचा चालू राजकीय परिस्थितीशी संबंध पूर्णतः संपल्या नंतर अशा भेटी झाल्याचे बाहेर येते. अनेकवेळा अशी चर्चा दोन्ही बाजूच्या दूतांकरावी घडते. राज शिष्टाचार ही संकल्पना पाळली जाईल असे समजूनच फडणवीसांनी राऊतांना भेट दिली असावी पण याचे ही राजकारण केले जाईल असे फडणवीसांना वाटले नसावे कारण अशा बैठकांचे राजकारण करणे राज शिष्टाचाराला धरून नसते मात्र राऊतांनी इथेही माती खाल्ली.

भेट झाल्याची माहिती माध्यमातून आली कशी? अशी भेट झाली हे माध्यमातून समोर येणे आणि त्यात राजकीय पॉईंट स्कोर केला जाणे ही हालचाल मुळात आऊट ऑफ बॉक्स आहे असे होऊ शकते असा विचार फडणवीसांनी केला नसावा पण राऊतांनी यात राजकारण साधले. सुरुवातीला भेट झाल्याचे नाकारून नंतर मात्र राऊतांनी त्या भेटीवर शिक्कामोर्तब केले तेव्हा स्पष्टीकरण देण्यावाचून भाजप कडे काहीही उरले नाही. ही भेट मुलाखतीसाठी असल्याचे कारण भाजप कडून देण्यात आले.

भेट घेणे, भेट होणे त्याची माहिती मीडियाला मिळणे, सुरुवातीला भेट नाकारणे नंतर स्वीकारणे हे राऊतांचे कुटील राजकारण होते हे आता झाकून राहिलेले नाही. परंतु राजकारणात राज शिष्टाचार न पाळल्याने राऊतांचे काळा चेहरा समोर आला आहे. मुत्सद्दी बैठका या राजकीय वर्तुळात पडद्यामागे घडणाऱ्या हालचाली असतात त्या पडद्यावर न आणणे ही दोन्ही बाजूची नैतिक जबाबदारी असते मात्र राऊतांकडून ती पाळली गेली नाही. राजकारण काहीही असो मात्र असे वागणे राज शिष्टाचाराला धरून नाही. राऊत असे नीच राजकारण करू शकतात हे मात्र आज जगजाहीर झाले. ताक पोळले आता दूधही फुंकून प्यावे लागणार..!