बंजारा समाजाचे धर्मगुरू आणि संत सेवालाल महाराजांचे वंशज रामराव महाराज यांचे काल मुंबईत रात्री ११ वाजता निधन झाले. डॉ. रामराव महाराज यांची प्रकृती गेल्या एक वर्षापासून अस्थिर होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. काही महिन्यांपासून त्यांना श्वसनाचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांना मुंबईतील प्रसिद्ध लीलवती रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते.
गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्थिर असल्याने त्यांनी मुंबईमध्ये उपचार घेतले होते. दरम्यान, काल कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी ३० ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या सोबत महंत शेखर महाराज होते. रामराव महाराज १९४८ पासून बंजारा समाजाचे भक्तीचे ठिकाण असलेल्या पोहरादेवी संस्थानच्या गादीवर विराजमान होते.