जगभरात कोरोनामुळे थैमान माजले आहे देशभर अर्थात राज्यभारतही गेल्या अनेक महिन्यापासून टाळेबंदी जाहीर केली होती. काही ठिकाणी परिस्थिती पाहून काही बाबींसाठी टप्या-टप्प्याने सूटही देण्यात अली होती. मात्र भारतीय नागरिक आणि कोणतेही नियम काटेकोरपणे पाळणार व ते नियम तोडणार नाहीत असे कधी झालंय काय?
महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ८२ हजार गुन्हे तसेच १३४७ वाहनांवर अवैध वाहतूकीचे गुन्हे दाखल; ३१ कोटी ४८ लाख रुपयांची दंड आकारणी. ४१२९१ जणांना अटक तर ९६५८३ वाहने जप्त करण्यात आले आहेत असे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माहिती दिली.
आता वेगवेगळ्या महापालिका आणि काही जिल्ह्यातील प्रशासनाने मुकपट्टी(मास्क) न वापरल्यास दंड आकारणार असे आदेश जाहीर केले आहेत. याच कारवाईमध्ये मुंबई महापालिका प्रशासनाने मास्क न वापरणार्यास ४०० दंड आकारणार असल्याचे जाहीर केले आहे आणि दंड वसुलीचे काम सुरूही झाले आहेत. राज्यातील जनतेने सरकार आणि प्रशासनाला कोविड विरोधातील लढाईत सहकार्य केलं पाहिजे अशी सर्वांची भावना आहे.