घटस्थापनेच्या दिवशी एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा होती. परंतु असे घडले नाही. सध्या खडसेंबरोबर त्यांची कन्या रोहिणी खडसे-खेवलकर पक्षांतर करतील अशी चर्चा सुरू आहे. परंतु भाजपच्या खासदार सुनबाई रक्षा खडसे या काय निर्णय घेतील, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
खडसेंची सून रक्षा खडसे यांना महाराष्ट्र कार्यकारिणीत मंत्रीपदाची जबाबदारी भाजपने सोपवली आहे. केवळ दिड वर्षच झाले असल्याने त्या भाजपमध्ये राहून उरलेले चार वर्षे पूर्ण करतील असा अंदाज आहे. खडसेंसह त्यांची मुलगी रोहिणी खडसे-खेवलकर आणि दहा ते पंधरा आमदारही राष्ट्रवादीत प्रवेश करतील असे वृत्त समोर आले आहे.
विधानसभेत एकनाथ खडसेंना तिकीट न देता त्यांच्या कन्येला तिकीट देण्यात आले. आता बापलेक दोघेही राष्ट्रवादीत गेले तर भाजप पक्ष चिंतेत पडणार आहे.