‘बाबा का ढाबा’ : सोशल मिडीयाची कमाल, वृद्ध दांपत्याच्या ढाब्यावर गर्दी

32

सोशल मीडियामुळे अनेक वाईट गोष्टी घडलेल्या आपण पाहिल्या आहेत. पण अनेक विधायक कामे देखील सोशल मीडियामुळे होतात. अनेकांची लाईफ सोशल मीडियामुळे बदलते हे आपण पाहिलं आहे का ? तर बघा मग…

हा प्रसंग दिल्लीत घडला आहे. दिल्लीतील मालवीय नगर येथील बाबा का ढाबा नावाच्या छोटा ढाबा ८० वर्षाचे वृध्द कांता प्रसाद आणि त्यांची पत्नी चालवते. गेल्या काही महिन्यांपासून चालू असलेल्या कोरोना बिमारीच्या प्रादुर्भावामुळे सगळं मार्केट ठप्प आहे. त्यातच हा बाबा का ढाबा सुद्धा बंद असल्याने, कांता प्रसाद अडचणीत आले होते. त्यातच एका फूड यू ट्यूब र ने त्यांचा व्हिडिओ तयार केला. त्यात कांता प्रसाद यांनी आपली करून कहाणी सांगितली. तो व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. त्यानंतर मात्र या ढाब्यावर खाऊ प्रेमींनी गर्दी केली आहे.

अनेक सेलिब्रिटींनी हा व्हिडिओ शेअर करत बाबाच्या ढाब्यावर जाण्याचं आवाहन केलं होतं. रणदीप हुड्डा, रविना टंडन, स्वरा भास्कर, सुनील शेट्टी, यांनी आपल्या सोशल मिडिया अकाऊंट वरून बाबाच्या ढाब्यावर जाण्याचं आवाहन केलं होतं. त्याला दिल्लीकरांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे बाबाच्या ढाब्यावर मोठी गर्दी पाहायला मिळते आहे.


१९९० पासून हा ढाबा चालू आहे. चहा, डाळ, भात, भाजी, चपाती, पराठे इत्यादी पदार्थ इथे मिळतात. सोशल मीडियामुळे या वृध्द दांपत्याला मोठा आधार मिळाला आहे. त्यांच्या अनेक बातम्या मीडियातून प्रसिद्ध होत आहे.