बारमध्ये महिलांसाठी धक्कादायक ऑफर; ‘नो शर्ट फ्री बियर’

27

जगभरात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या दरम्यान देशात केंद्र सरकारने लॉकडाउनची घोषणा केली. या लॉकडाउनमध्ये सर्व बाबींवर निर्बंध आले. रेस्टॉरंट आणि बियर बारही सुरू झाले. अशा अवस्थेत नवी मुंबई येथे एका बियर बारने गर्दी होण्यासाठी धक्कादायक प्रकार केला आहे.

नवी मुंबईमध्ये पाच बीच गॅलेरिया मॉलमध्ये एजेन्ट्स जॅक्स बारमध्ये हा प्रकार होत आहे. भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हा धक्कादायक प्रकार समोर आणला. कस्टमर्सना बारमध्ये येण्यास प्रवृत्त करण्यासाठी बारमध्ये अश्लिल आणि धक्कादायक जाहिराती देण्यात आल्या. पुरुषांसाठी ‘ नो शर्ट नो सर्विस’ आणि महिलांसाठी ‘नो शर्ट फ्री बियर’ ही ऑफर बार मालकाने ठेवली आहे. यासोबत अल्कहोल किल्स कोरोना ही जाहिरातही तयार करण्यात आली. दरम्यान अजून जाहिरातदारांवर करवाई केली नाही.