दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटील लिखित ‘देह वेचावा कारणी या’ आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा मंगळवारी सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते पार पडणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे तसेच विविध पक्षाचे मान्यवर, पदाधिकारी प्रवरानगर येथे मुख्य कार्यक्रमस्थळी उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी मराठीत ट्विट करुन आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली होती.
या आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्यात बाळासाहेब विखे पाटील यांच्या सन्मानार्थ प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे नामांतर करुन, त्या संस्थेला ‘लोकनेते डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था’असे नाव दिले जाईल.