मुंबईत कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. काही प्रमाणात कोरोना नियंत्रणात येत असला तरीही संकट अजून टळलेले नाही. लोक याअंतर्गत असलेले नियम मोडताना दिसत आहेत. सार्वजनिक ठिकाणी मास्क व सोशल डिस्टन्सिंग पालन करत नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात प्रयत्न सुरूच आहेत. याच वेळी ‘दो गज की दूरी, मास्क है जरूरी; असे आवाहन बॉलीवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी पालिकेच्या वतीने मुंबईकरांना केले आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नियंमांचे पालन करणे गरजेचे आहे. जोपर्यंत या विषाणूवर लस निघत नाही तो पर्यंत सार्वजनिक ठिकाणी बेजबाबदार वागणं हे सर्वांनाच धोकादायक ठरू शकतं. नियम पाळूया आणि सगळे मिळून कोरोनाला हरवूया, असे आवाहन बिग बींनी एका ऑडिओ टेपच्या मार्फत जनतेला दिले आहे. कोरोनाची काही लक्षण असल्यास 1075 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करा असेही सांगण्यात आले आहे.
दरम्यान मागच्या काही दिवसांमध्ये कोरोना विषाणूबाबत चुकीच्या अफवा पसरविल्याने बच्चन ट्रोल झाले होते. याचा उल्लेख करत विकिपीडियामध्ये बच्चन यांना चुकीची माहिती पसरविणार्यांच्या रांगेत बसविण्यात आले होते.