बॉलीवुड अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या मृत्यूनंतर बॉलीवूडमध्ये नेपोटीझमचा मुद्दा समोर आला आहे. हा वाद अजून संपला नाही तोपर्यंत ‘बिग बॉस’च्या घरात ही नेपोटीझमचा वाद सुरू झाला आहे. ‘बिग बॉस’ मध्ये भांडण, प्रेम, मैत्री सर्व काही पाहायला मिळते. नेपोटीझमच्या मुद्द्यांवरून बिग बॉसच्या घरात भांडण पेटले होते. हा वाद सध्या चर्चेत आहे.
‘बिग बॉस’च्या घरात नॉमिनेशनची प्रक्रिया सुरू होती. यात प्रत्येक सदस्याला दोन स्पर्धकांना नॉमिनेट करायचे होते. या टास्कमध्ये गायक राहुल वैद्य याने कुमार सानु यांचा मुलगा जान सानु याला नॉमिनेट केले. या दरम्यान कारण स्पष्ट करताना त्याने घराणेशाहीचा मुद्दा उचलला. मला घराणेशाहीचा खूप राग येतो, इथे जेवढे स्पर्धक आलेत त्यांनी स्वतःच्या मेहनतीने घरात एंट्री मिळवली आहे. पण जानला त्याच्या वडिलांमुळे एंट्री मिळाली आहे. त्याची स्वतःची अशी ओळख नाही. असे यावेळी राहुलने स्पष्ट केले. राहुलच्या या वक्तव्यानंतर घरातील सर्व स्पर्धकांनी राहुलला विरोध करण्यास सुरुवात केली यावरून स्पर्धकांमध्ये अजून वाद पेटला.
दरम्यान, या सर्व वादानंतर जान सानुने देखील राहुलला उत्तर दिले, ‘माझे वडील कुमार सानु आहेत. प्रत्येकजण माझ्याइतका नशीबवान नसतो. खासकरून तु ही नाहीस, माझ्या वडिलांना काही बोलू नकोस असा जानने राहूलला टोला लगावला. सोशल मीडियावर राहुलच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. काही जणांनी त्याला पाठींबा दिला तर काहींना यावर टिका केली.