नुकतीच बिहार विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. बिहार राज्याला राजकारणाची ‘राजधानी’ संबोधलं जातं कारण मागच्या अनेक दशकांपासून तेथील निवडणुका खूप चुरशीच्या होत आल्या आहेत व तेथील राजकारण हि रंजक राहिला आहे. सध्या बिहार चे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि सत्तेत असलेल्या भाजपला अनेक छोट्या-छोट्या पक्षाची साथ मिळणार हे निश्चित झालेच आहे त्यात पासवान, जितनराम मांझी यांचाही समवेश आहे.
प्रामुख्याने एनडीए आणि महागठबंधन यांच्यात सामाना होणार आहे. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीने ही उडी टाकली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बिहार मध्ये निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे जे महाराष्ट्रात करणे झाले अन्ही ते आम्ही बिहारमध्ये करून दाखवू असा विश्वास आंबेडकरयांनी व्यक्त केला आहे.
वंचित बहुजन आघाडी त्यांचे स्थापनेपासूनचे मित्र एमआयएम सोबत जाणार कि कॉंग्रेस सोबत कि अन्य कोणत्या पक्षासोबत जाणार हे पाहणे औत्सुक्याचे राहील महाराष्ट्रात वंचित ने काही ठिकाणी आपला चांगला प्रभाव सोडला होता.