बिहार निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. महागठबंधन आणि महायुतीचे म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे जागांसाठीचे चर्चा विमर्श मोठ्या प्रमाणत सुरू आहेत. महागठबंधन मध्ये राष्ट्रीय जनता दल म्हणजे तेजस्वी यादव यांचा पक्ष मोठा भाऊ झाला आहे कॉंग्रेस त्यात लहान भाऊ झाला आहे. त्यातच आता रालोआ मध्ये सर्व काही आलबेल नाही असे दिसून येत आहे. जनता दल युनायटेड आणि भारतीय जनता पक्ष दोन प्रमुख पक्ष रालोआ मध्ये आहेत त्यांच्याच सोबत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचा लोक जनशक्ती पार्टी हा पक्ष होता.
जागांच्या वाटाघाटीवरून रालोआ मध्ये काही मतभेद झाल्याचे बोलले जात आहेत. काल लोजपा चे अध्यक्ष चिरण पासवान यांनी आम्ही रालोआत आहोत पण नितीश कुमार यांच्या पक्षाच्या विरोधात आहोत. असे जाहीर केले होते. आमचे मतभेद भाजपशी नाहीत तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड बरोर आहेत. आम्ही भाजपच्या विरोधात उमेदवार उभे करणार नाहीत असेही त्यांनी जाहीर केलं आहे. चिराग पासवान हे केंद्रीय मंत्री रामविलास पावासन यांचे चिरंजीव आहेत आणि तेच आता लोक जनशक्ती पार्टीचे सर्वेसर्वा आहेत.
“आमच्या मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या कडून बिहारच्या विकासाची खुप अपेक्षा होती पण हाती निराशा अली आहे. बिहार सरकारच्या योजना गरीब लोकांपर्यंत म्हणजेच खालच्या स्तरापर्यंत पोचल्याच नाहीत” असे चिराग पासवान अपन जनता दल युनायटेड सोबत का नाहीत असे विचारले असता माध्यमांशी बोलले.
