बिहार प्रचारातून वेळ काढत, फडणवीस करणार अतिवृष्टी झालेल्या भागाचा तीन दिवस दौरा

16

मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने मोठा धुमाकूळ घातला. अनेक शेतकऱ्यांच्या पिकांच मोठं नुकसान यावेळी झालं. नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी शरद पवार, आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यात दौरे आखले आहेत. त्यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा तीन दिवसाचा दौरा करणार असल्याचं म्हटलं आहे. १९ ऑक्टोबर पासून फडणवीस तीन दिवसांचा दौरा करतील.

फडणवीस १९ तारखेला बारामती पासून दौऱ्याला सुरुवात करतील. २० ला उस्मानाबाद, लातूर, बीड आणि परभणी. २१ तारखेला हिंगोली, जालना, औरंगाबाद येथे पाहणी करणार आहेत. बिहार निवडणुकीची मोठी जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. राज्याचे मुख्यमंत्री, आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे राज्य दौरे होत आहेत. मग फडणवीस तरी कसे मागे राहतील.