बॉलीवूड अभिनेत्रीवर प्राणघातक हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू

10

बॉलीवूड अभिनेत्री आणि ‘उडान’ फेम मालवी मल्होत्रावर प्राणघातक हल्ला झाला आहे. हे धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. सध्या मुंबईतील कोकीलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहेत.

समोर आलेल्या माहीतीनुसार, योगेश असे हल्ले खोराचे नाव असून, त्याने स्वतःची निर्माता म्हणून ओळख करून दिली होती. मालवी एका भेटीनंतर वर्सोवा इथल्या सीसीडीमधून घरी निघाली होती. त्यावेळी योगेश ऑडी कारमधून येऊन मालवीला जबरदस्ती गाडीतं बसण्यास सांगितले. मालवीने नकार दिला आणि पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिली. त्यावेळी तिच्या पोटावर चाकूने हल्ला करण्यात आला. यानंतर हल्लेखोराने तिच्या चेहऱ्याला टार्गेट केलं. मालवीने चेहरा वाचवण्याचा प्रयन्त केला. या हल्ल्यात अभिनेत्रीच्या डाव्या आणि उजव्या हाताला जखम झाली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल केले.

या हल्लेखोराविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. सध्या मालवीची प्रकृती स्थिर असून रुग्णालयात देखरेखीखाली आहे. मालवी मूळची हिमाचल प्रदेशातील आहे. तिने छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. तेलुगू, मल्याळम चित्रपटांचमध्ये देखील तिने काम केलं आहे.

मालवी मल्होत्राच्या तक्रारीवरून पोलीसांनी आरोपी योगेश महिपाल सिंहच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. याबाबत तपास देखील सुरू आहे. पोलिसांना घटनास्थळी सीसीटिव्ही फुटेजमध्ये महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्यानुसार गुन्हेगारास लवकरचं शिक्षा होऊ शकते.