ब्रेकिंग : …अखेर खडसेंनी घड्याळाची वेळ साधली, राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित

16

भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. जळगावात खडसेंच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाचे मोठे बॅनर लागले आहेत. चार दशकांची साथ सोडत खडसे आता राष्ट्रवादीत प्रवेश करतील. शुक्रवारी ह्या पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शुक्रवारी दुपारी दोन वाजता खडसे राष्ट्रवादीत दाखल होणार आहेत. खडसेंसोबत आता नेमके कोणकोण भाजप सोडून राष्ट्रवादीत जातील याबद्दल चर्चा आहे. खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांना काय मिळणार असा प्रश्न विचारला असता, खडसेंचा पक्षप्रवेश हा सुखद क्षण असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. एकनाथ खडसेंच्या अनुभवाचा पक्षाल फायदा होईल असंही ते