भाजपचे ज्येष्ठ नाराज नेते एकनाथ खडसे गेल्या काही दिवसांपासून भाजपवर नाराज आहेत. त्यांनी वेळोवेळी भाजप आणि राज्यातील भाजप नेत्यांवर टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपासून खडसे अस्वस्थ आहेत. पक्षविरोधी अनेक कारवाया त्यांनी केल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून खडसे राष्ट्रवादीत जाणार असल्याचे वृत्त अनेक माध्यमांनी दिले होते. आता एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश हा निश्चित मानला जात आहे. लवकरच राष्ट्रवादीकडून खडसे यांच्या पक्षप्रवेशाबद्दल अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
याबाबत लवकरच खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृत घोषणा केली जाणार आहे. राष्ट्रवादीत प्रवेशानंतर एकनाथ खडसे यांच्यावर पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची माहिती आहे. खडसे यांच्या प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रातील अनेक नेते राष्ट्रवादीत प्रवेश करतील असा अंदाज वर्तवला जातोय. खडसे राष्ट्रवादीत जाणार असल्याची बातमी मराठीतील प्रमुख वृत्तसंस्थेने दिली आहे.