भारताला हिंदूराष्ट्र घोषित करावे या मागणीसाठी अयोध्योत आंदोलन

15

केंद्रात भाजपा सरकार सत्तेत आल्यापासूनच भारताला हिंदूराष्ट्र घोषित करावे ही हिंदूत्ववादी संघटनांची मागणी आहे. राममंदिर निर्माणाचा मार्ग मोकळा झाल्यापासून अनेक हिंदूत्ववादी संघटना कृष्णजन्मभुमी मथूरेसाठी देखील आग्रही आहेत. यातच भारताला हिंदूराष्ट्र घोषित करावे ही मागणी वारंवार उचलुन धरत असतात. ही मागणी आता पुन्हा जोर धरत असून अयोध्येत यासाठी एक महंत उपोषणाला बसले आहेत.

 तपस्वी छावणीचे महंत परमहंस दास यांनी  भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याच्या मागणीसाठी उद्यापासून (१२ ऑक्टोबर) आमरण उपोषणास सुरूवात करणार असल्याची घोषणा केली आहे. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ५ वाजेपासून उपोषणास सुरूवात करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या अगोदर त्यांनी राम जन्मभूमीसाठी अनेक दिवस आमरण उपोषण केलं होतं व त्यानंतर ते चर्चेत आले होते.

या उपोषणाद्वारे ते भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठी व मुस्लिमांचे नागरिकत्व समाप्त करण्यासाठी सरकारवर दबाव निर्माण करतील. याचबरोबर परमहंस दास यांनी बांग्लादेश आणि पाकिस्तान राहत असलेल्या हिंदूंना भारतात आणण्याची व भारतातील मुस्लीमांना पाकिस्तान व बांग्लादेशात पाठवण्याची देखील मागणी केली आहे.