कोरोनाकाळात बंद असलेल्या अनेक सेवा हळूहळू सुरू होतं आहेत. हाॅटेल आणि चित्रपट गृह, बस सेवा, शाळा-महाविद्यालयं देखील काही नियमं घालून सूरू होत आहेत. मात्र अजूनही प्रतिक्षा आहे. ती म्हणजे धार्मिक स्थळं सुरू करण्याची.
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यादरम्यान धार्मीक स्थळे खुले करण्याबाबत काही ठोस उपाययोजना होईल अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र ती अपेक्षा फोल ठरली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे धार्मीक स्थळे सुरू करण्याबाबत सकारात्मक असले तरी इतक्यात त्याबाबत विचार करता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. आपण याआधी ज्याप्रमाणे इतर सणउत्सव साजरे केले त्याच प्रमाणे आपल्याला दिवाळी आणि इतर सण साजरे करायचे आहेत असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.