..मग कामगारांनी काय आकाशात उडत कामावर जायचं काय ?

14

मुंबई आणि मुंबई उपनगराची ‘धमनी’ असलेली लोकल रेल्वे कोरोनामुळे बंद झाली आहे. काही अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचारी वगळता इतरांन रेल्वेने प्रवासाची सूट राज्य सरकारकडून दिली गेली नाही. बेस्ट बसेस मात्र सरू आहेत. त्यातही चाकरमन्यांना मरणयातना सोसाव्या लागत आहेत. बेस्ट सुरु आणि लोकल बंद या मागचा तर्कहि न पटण्यासारखा आहे या कारणामुळे मनसे नेत्यांनी काही दिवसापूर्वी सविनय कायदेभंग करत लोकल मध्ये प्रवास करत विरोध प्रदर्शन केला होता. मनसे नेते संदीप देशपांडे यांना यामुळे अटकही झाली होती.

उदरनिर्वाहा साठी मुंबईत काम करणारे बहुतांश चाकरमाने मुंबई उपनगरांत राहतात. किती दिवस ते घरात बसून राहणार ? खासगी वाहने त्यांना परवडणार आहेत काय ? प्रत्येकांकडे स्वताचे वाहन असेलच असे आहे काय ? लोकं बेरोजगार होत आहेत असे अनेक प्रश्न मनसेने आघाडी सरकारला विचारले आहेत. दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत आहेत हेही मान्यच कराव लागेल पण कामगारांचाही विचार करावा लागेल. काहीतरी ठोस नियम व अटी टाकून सर्वांसाठी लोकल सुरु केल्यास असंख्य चाकरमान्यांना याचा फायदा होईल व नोकऱ्या वाचतील.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही नियम व अटी टाकून रेस्टोरंट सुरु करण्याचे संकेत दिले आहे. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सरकारच्या लोकल ट्रेन सुरु न करण्याच्या निर्णयाला विरोध दर्शावत उपहासात्मक ट्वीट करून टीका केली आहे.

संदीप देशपांडे यांच्या ट्वीटर वरून.

#Unlock5 सुरू होणार आहे मुख्यमंत्रांनी संकेत दिले की उपहार गृह सुरू करणार आहेत. तिथे काम करण्याऱ्या कर्मचाऱ्यांची वाहतूक व्यवस्था काय? की त्यांनी आकाशात उडत कामावर यायचं???????