अभिनेते सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकार विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिमा समाज माध्यमांद्वारे सुनियोजितपणे मलीन करण्याचा प्रयत्न झाला जवळपास ८० हजार खोटे सोसीअल मेडिया अकाऊंट्स ( ट्विटर, फेसबुक ) मुंबई पोलिसांना बदनाम करण्याच्या हेतूने सक्रीय होते अशी प्रतिक्रिया मुंबई पोलिस व महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून येत आहे.
‘एबीपी माझा’ वृत्त वाहिनीवरील चर्चा सत्रात भाजप प्रवक्ते आमदार राम कदम यांनी राज्यातील सरकारला खुले आव्हान दिले आहे कि राजकीय दृष्ट्या सुनियोजितपणे एखाद्या यंत्रणेची आणि राजकीय नेत्यांची बदनामी करणे अत्यंत चुकीचे आहे आणि त्यांचा शोध घेवून त्यांच्यावर कठोर कारवाई करा. या चर्चा सत्रात शिवसेनेचे प्रवक्ते खासदार अरविंद सावंत यांनी भाजपवर थेट आरोप केले आहेत. मुंबई पोलीस आणि महाविकास आघाडी सरकारची जाणीवपूर्वक बदनामी करणऱ्या या सर्व ८० हजार खोट्या सोसीअल मेडिया अकाऊंट्स ला भाजपची पाठबळ असल्याचा त्यांनि दावा केला आहे. चर्चासत्रात कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटीलहि उपस्थित होते.