सकाळी कधी उठाव हे आपापल्या मनावर अवलंबून असतं. पण आज घडीला झोपेतून उशिरा उठण्याच प्रमाण वाढलं आहे. भारतीय संस्कृती, परंपरा, शास्त्र, योगा, आयुर्वेद इत्यादींमध्ये सकाळी लवकर उठण्याला विशेष महत्त्व आहे. सकाळी उठण्याचे मोठे फायदे शरीराला होतात. रात्री उशिरा झोपणं आणि सकाळी उशिरा उठणे हे आता नित्याचच झालं आहे. पण यामुळे अनेक तोटे देखील आहेत. काय आहेत फायदे आणि तोटे पाहुयात…
उशिरा उठण्याने ‘हे’ आहेत तोटे –
1 ) उशिरा उठल्याने आपली पचनक्रिया व्यवस्थित होत नाही.
पचनव्यवस्था मंदावते.
2 ) त्वचा निस्तेज राहते. म्हणजेच त्वचा रुक्ष होऊन कोरडी पडते. तसेच त्वचेवरील तेज कमी होते.
3 ) दैनंदिन जीवनात चिडचिड होते. मानसिक संतुलन व्यवस्थित राहत नाही.
4 ) कामे पटापट होत नाहीत. म्हणजेच दिवसाचा वेळ अन्य कामांसाठी पुरत नाही.
5 ) केसांवर परिणाम होतो. केसांची बळकटी कमी होते. केस गळण्याचे प्रोब्लेम येऊ शकतात.
6 ) दिवसभर आळस वाटतो. जांभई येत राहते.
7 ) काम करण्यासाठी उत्साह राहत नाही. शरीर आणि मन ताजेतवाने राहत नाही.
लवकर उठण्याचे ‘हे’ आहेत फायदे…
1 ) लवकर उठण्याच्या सवयीचा दूरगामी लाभ होतो. करीयर, खेळ, आवडीनिवडी सर्वांनाच वेळ देता येतो.
2 ) ‘लवकर निजे लवकर उठे त्यासी आरोग्यसंपदा लाभे’… आरोग्यही उत्तम असते.
3 ) मॉर्निंग ऑक्सिजन आपल्याला खूप ऊर्जा देतो. शुद्ध वायू असल्याने त्याची चांगले परिणाम शरीरावर होतात.
4 ) सकाळी लवकर उठल्यामुळे तुमची कामे वेळेत पूर्ण होतात. काम वेळेत झाल्यामुळे तुमच्यातील आत्मविश्वास अधिक वाढतो.
5 ) सकाळी लवकर उठल्यावर तुम्ही नेहमी फ्रेश आणि कार्यक्षम वाटते. शिवाय व्यायाम केल्यामुळे तुमची शरीरप्रकृती ठणठणीत राहते.
6 ) झोप आणि दिवसभराची कामे यांचे गणित चुकल्यामुळे तुमची दिवसभर चिडचिड होत असेल तर सकाळी लवकर उठा. कारण लवकर त्यामुळे तुमची कामे लवकर पूर्ण होतील.
7 ) मनात चांगले आणि हिताचे विचार येतात. जे तुमच्या दिवसाच्या सुरूवातीसाठी अतिशय उत्तम असतात.