मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावे नेहमी चर्चेत असते. चित्रपटसृष्टीत गेल्या काही दिवसांपासुन लग्नाचा मोसम सुरु आहे. यात अजुन एक अभिनेत्रीची भर पडली. लॉकडाउनच्या काळात शर्मिष्ठा राऊत, सोनाली कुलकर्णी, सई लोकुर या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं लग्न ठरल्याचं समजलं आहे. शर्मिष्ठा राऊत हीचा लग्नसोहळाही पार पडला.
झी मराठीवरील ‘खुलता खळी खुलेना’ फेम अभिज्ञा भावे पुन्हा एकदा विवाहबंधात अडकणार आहे. नुकताच तिचा साखरपुडा सोहळा संपन्न झाला आहे. अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून दिली आहे. अभिज्ञाने ‘माझा साखरकारखाना’ असे कॅपशन देत साखरपुड्याचे फोटो शेअर केले. चाहत्यांनी त्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. कुटुंबियांच्या उपस्थित कमी लोकांमध्ये तीने साखरपुडा केला आहे. अभिज्ञा पुढच्या वर्षी लग्न करेल अशी चर्चा सुरू आहे.
अभिज्ञाचा नवरा मेहुल पै हा मुंबईचा आहे. ‘क्लॉक वर्क्स इव्हेंट्स प्रायव्हेट लिमिटेड’ मध्ये ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून तो कार्यरत आहे. अभिज्ञाने मराठी सोबत हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे. अभिज्ञा चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी एअरहॉस्टेस होती. अभिज्ञा ही व्यावसायिक असून तिने अभिनेत्री तेजस्विनी पंडित सोबत तेजाज्ञा नावाचा साडीचा ब्रॅंडही बनवला आहे. लोकप्रिय मालिका ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत अभिज्ञाची एंट्री झाली असून ती डॉक्टर तनुजा भारद्वाज हे पात्र साकारत आहे.