मराठवाड्यात काल मंगळवारी ४३० कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ११ जणांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात काल ९९ कोरोनाबधीतांची वाढ होती. तसेच इतर जिल्ह्यातील एक आणि औरंगाबाद जिल्ह्यातील ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मराठवाड्यात काल वाढलेल्या कोरोना रुग्णांची संख्या : –
१ ) उस्मानाबाद : ४५
२ ) जालना : ३४
३ ) नांदेड : ६६
४ ) बीड : ९३
५ ) लातूर : ७१
६ ) परभणी : १७
७ ) हिंगोली : ०५
सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याची दिलासादायक बातमी आहे. मात्र, अजूनही पूर्णपणे कोरोनावर नियंत्रण मिळालेलं नाही. त्यामुळे सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे.