मराठवाड्यात पावसाचा जोर कायम, दहिफळमधील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

198

मराठवाड्यात पावसाचा जोर कायम आहे. संततधार पावसाने मराठवाड्यातील जनजीवन विस्कळीत आहे. काल रात्री झालेल्या जोरदार पावसाने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांच्या झालेल्या नुकसानीचे लवकर पंचनामे करून मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

मराठवाड्यातील जालना जिल्ह्याला काल रात्री मुसळधार पावसाने झोडपले. जिल्ह्यात असलेले सावंगी येथील धरण ओव्हरफ्लो झाल्याने नदीकाठच्या गावांचे मोठे नुकसान झाले आहे. गिरिजा नदीकाठी असलेल्या साळेगाव, दहिफळ मोतीगव्हाण, टाकरवन शिवारातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून नदीकाठी असलेली पीके वाहून गेली आहेत. कपाशी सोयाबीन आणी अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.