मराठा आरक्षण : महाराष्ट्र बंद घेतला मागे

21

मराठा आरक्षणासाठी शनिवारी बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, आता तो बंद मागे घेण्यात आला आहे. तशी माहिती सकल मराठा महासंघाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली. राज्यात मराठा आरक्षण मिळविण्यासाठी वातावरण चांगलंच पेटल आहे. मराठा आरक्षण समितीच्या वतीनं मराठा आरक्षणासह उद्या, शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मात्र सरकारने अनेक मागण्या मान्य केल्याने उद्याचा बंद मागे घेतला आहे.

मराठा समाजाच्या वतीने सुरेश पाटील यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली असून, ही चर्चा सकारात्मक झाली आहे. एक महिन्यांचा अवधी त्यांनी घेतला आहे. याशिवाय MPSC परीक्षा पुढे ढकलण्याबाबतही चर्चा सकारात्मक झाल्याचं सुरेश पाटील यांनी सांगितलं आहे. लवकरच यावर तोडगा निघेल असा आशावाद पाटील यांनी बोलून दाखवला.