नवरात्री उत्सवात नऊ दिवसात दुर्गेच्या नऊ रूपांची पुजा केली जाते. याच आधारावर सिनेसृष्टीतील मराठी अभिनेत्रींनी वेगवेगळी रूप साकारतं फोटो शेअर केले आहेत. संकटात समाजासाठी झटणाऱ्या कोरोनाच्या योद्धा देवीच्या रुपात साकारतं अभिनेत्री तेजस्वीनी पंडितने फोटो शेअर केले आहेत. या पोस्टनां चाहत्यांची भरपूर प्रमाणात पसंती मिळत आहे.
यंदा तेजस्वीनीने खास थीम ठेवली आहे. तिने गेल्या तीन दिवसात भरपूर फोटो पोस्ट केले आहेत. अहोरात्र जनतेसाठी झटणाऱ्या मुंबई पोलिसांच्या कार्याला सलाम केला आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. तसेच तिने कोरोनाच्या संकट काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेला वाचवणाऱ्या डॉक्टरांची ही कृतज्ञता व्यक्त केली आहे. साफसफाई करणाऱ्या माहिलेची देवी रुपात भूमिका साकारतही तिने फोटो शेअर करत सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग राखाडी असल्याने अभिनेत्री रुपाली भोसले हिने राखाडी रंगांची साडी परिधान केली. माँ दुर्गाच्या रौद्र रूपातील फोटो पोस्ट केले आहेत.
दुसऱ्या दिवशी केसरी रंग असल्याने तिने केसरी रंगातील कपडे परिधान करत हातात चाबूक घेऊन त्या रुपातील फोटो शेअर केले आहेत. या फोटोत रागीट चेहरा, कपाळावर लाल रंगाचा मोठा टिळा, हातात चाबूक असा लूक रुपालीने केला आहे.
अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिनेही देवीच्या रुपात पांढऱ्या रंगाची साडी नेसून पोस्ट केले. या फोटोत ती गाडीवर बसली आहे. तसेच महिला पोलीस कर्मचाऱ्यांबरोबरही तिने फोटो काढून शेअर केले.
स्वच्छतेचा संदेश जनतेला देत महानगर पालिकेच्या निर्माल्य कलशा शेजारी तिने फोटो काढून पोस्ट केले आहेत.
नवरात्रोत्सवाच्या काळात आपण सर्वजण शक्तीरुप दुर्गेची उपासना करतो. शक्तीस्रोतामधून ऊर्जा ग्रहण करून स्वतःच्या अंतरंगात देवीचा अंश जागृत करून हीच देवीची उपासना आहे. यासाठी मराठी अभिनेत्रींनी एका अनोख्या स्वरूपात देवीची आराधना केली. अभिनेत्री तेजस्वीनी पंडित, अपूर्वा नेमळेकर, रुपाली भोसले यांनी नवरात्रीच्या दिवसात वेगवेगळ्या देवींची रूप साकारली आहे.