महाराष्ट्रातील पूरस्थितीबाबत पंतप्रधान मोदींनी साधला मुख्यमंत्र्यांशी संवाद

14

महाराष्ट्रात ओढावलेल्या अभूतपूर्व पूरस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शी फोनवरून चर्चा केली. पंतप्रधान मोदी यांनी स्वत: ट्टिट करून ही माहिती दिली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

“महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी आणि पूरस्थितीबाबत मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांच्याशी बोललो. आपत्तीग्रस्त बंधू-भगिनींबरोबर माझ्या सहवेदना आहेत. बचाव आणि मदतकार्यामध्ये केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल असं आश्वासन मी पुन्हा एकदा दिलं.” असं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्टिटसंदेशात म्हटले आहे.