महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार हे पुरोगामी नसून ‘प्रतिगामी’ आहे – प्रकाश आंबेडकर

19

देशासोबत महाराष्ट्रातही कोरोनामुळे टाळेबंदी जाहीर करण्यात आली होती. नंतर केंद्र सरकारने टप्प्या-टप्प्याने टाळेबंदीतील नियम व अटी शिथिल करत जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळ्या गाईडलाईन केंद्र सरकारने जाहीर केल्या आहेत पण राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केंद्राचे एकले नाही. त्यांनी स्वताची मनमानी केली. मुंबईतील चाकरमान्यांसाठी लोकल अजूनही सुरु केली नाही. खासगी कार्यालयांवरील कर्मचार्यांवरील निर्बंधाचे नियम अजून बदलले नाहीत. मंदिरे, धार्मिक स्थळे उघडले नाहीत, शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस इत्यादी अजून उघडायचे बाकी आहेत.

देशातील इतर राज्यांत मंदिरे, धार्मिक स्थळे उघडण्यात आले आहेत. दोन दिवसांपासून महाराष्ट्र भाजप नेते स्थळे सरकारने सर्व धार्मिक स्थळे उघडावे म्हणून आंदोलने करत आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात दोन दिवसांपूर्वी धार्मिक स्थळे उघडण्याच्या मुद्द्यावरून लेटर वर रंगला. वंचित बहूजन आघाडीनेही या आधीच मंदिरे उघडण्यासाठी पंढरपुरात आंदोलने केली होती.

धार्मिक स्थळे आणि इतर आर्थिक व्यवहारांच्या बाबी उघडाव्या म्हणून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकश आंबेडकर यांनी राज्य सरकारवर तोफ डागली आहे.