पॉपस्टार रिहानासोबतच काही परदेशी सेलीब्रीटींनी शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्वीट केले होते. यानंतर आपल्या देशातील खेळाडू आणि कलाकारांनी यांस प्रत्युत्तर म्हणून #indiatogether या हॅशटॅगसोबत ट्वीट केले. आपल्या देशातील सेलीब्रीटींच्या ट्वीटमध्ये बर्याचअंशी साधर्म आढळते. परिणामी ही सेलीब्रीटी मंडळी कुणाच्या दबावात येऊन तर ट्वीट करत नाही ना? त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी करणारे निवेदन महाराष्ट्र कॉंग्रेसने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिले. यावर चौकशी करणार असल्याचे अनिल देशमुख यांनी म्हटले आणि यावरुन एका नव्या वादास सुरुवात झाली.
राज्य सरकारच्या या निर्णयावरुन भाजपने सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली. अतुल भातखळकरांनी थेट अनिल देशमुख यांना अप्रत्यक्षरित्या त्यांच्या मेंदुवरच परिणाम झाल्याचा टोला लगावला होता. तसेच ज्याप्रमाणे ट्वीटची चौकशी करण्याचा निर्णय सरकार तत्परतेने घेऊ शकते तसाच शर्जील ऊस्मानी या हिंदूविरोधी व्यक्तीवर कारवाई करण्यात तत्परता का दाखवत नाही अशी भूमिका भाजपने सातत्याने घेतली आहे.
यावरव मुंबई येथे भाजपच्यावतीने ट्वीटर चौकशीच्या या निर्णयाविरुद्ध आंदोलन करण्यात आले. दरम्यान महाराष्ट्र भाजपाच्या ऊत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. संजय पांडेवरील कारवाईने पुन्हा भाजपने सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. संजय पांडे यांनी त्यांना अटक करत असतानांचा व्हिडिअो ट्वीट करत ठाकरे सरकार राज्यातून लवकरच हद्दपार होणार असे म्हटले आहे.
संजय पांडे हे भाजपचे जुने नेते आहेत. भाजपाच्या उत्तर भारतीय मोर्चाचे ते अध्यक्ष आहेत. भाजप युवा मोर्चाचेसु्धा मोठे पद त्यांनी सांभाळले आहे. कारवाई करतेवेळी संजय पांडे यांनी संताप व्यक्त केला आहे. “शिवसेनेने हिंदुत्व या विचारास कधीच तीलांजली दिली आहे. सत्तेसाठी शिवसेना लाचार झाली आहे. ज्यांना अटक करण्याची मागणी आम्ही करतो आहोत त्यांनाच अटक करण्यात येत आहे. या देशातील हींदू तुम्हाला कधीच माफ करणार नाही.” असे संजय पांडे यावेळी म्हणाले. तर भारतरत्नांचा अपमान करण्याऐवजी वेळेवर योग्य कारवाई केली असती तर ही वेळच आली नसते असे म्हणत भाजपने संजय पांडे यांचा एक व्हिडिअो ट्वीट केला आहे.