मराठा आरक्षणप्रश्नी प्रश्न विचारला असता ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी तरुणाला शिवीगाळ केल्याचा क्लिप प्रसारमाध्यमांवर व्हायरल होत आहे.
सध्या राज्यात आरक्षणाचा वाद मोठ्या प्रमाणात पेटला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला असून राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत.
“तुझ्या घरात घुसून मारेन, तुझं खानदान बरबाद करेन” अशा धमक्या देऊन शिवीगाळ केल्याचा आरोप तरुणाने केला आहे. त्यावर मोठा संताप व्यक्त केला जात आहे. लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारची धमकी देणे व शिवीगाळ करणे हे दुर्दैवी असल्याच्या भावना समाजमाध्यमातून व्यक्त केल्या जात आहेत. पोलिसांनी योग्य कारवाई करावी अन्यथा जे काही होईल त्याला मंत्री सत्तारचं जबाबदार असतील असे त्या तरुणाने म्हटलं आहे.
स्वतः युवकाने व्हिडीओ बनवून पूर्ण घटना सर्वांसमोर आणली आहे. तसचं आपले काही बरे वाईट झाल्यास त्याला मंत्री सत्तारच जबाबदार असतील असं देखील त्यानं म्हटलं आहे.
ही घटना मंत्री अब्दुल सत्तार सिल्लोड तालुक्यातील टाकळी जीवरग गावच्या दौऱ्यावर होते. यावेळी भगवान जीवरग या तरुणाने मराठा आरक्षणाच काय झालं? व शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सत्तारांना प्रश्न केला असता. मंत्री सत्तार यांची जीभ घसरली व त्यांनी त्याला अत्यंत खालच्या भाषेत शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप त्या युवकाने केला आहे.